|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » धावपळीच्या युगात आरोग्याची काळजी गरजेची- कारंडे

धावपळीच्या युगात आरोग्याची काळजी गरजेची- कारंडे 

वार्ताहर/ वाळवा

स्पर्धेच्या युगामध्ये मानवी जीवन खूपच धावपळीचे बनले आहे. धावपळीच्या जीवनामध्ये वजन कमी होणे. वजन वाढणे, रक्तदाब अशा अनेक व्याधी जडतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नॅचरल ग्रो-विटा कंपनीचे सल्लागार संतोष कारंडे (पुणे) यांनी केले.

    वाळवा येथे सिद्धेश्वर मठामध्ये आरोग्यविषयक नागरीक मेळाव्यामध्ये ते बोलत होते. नॅचरलचे संस्थापक नटराज कदम, सल्लागार रणजित ढगे, उद्योजक सचिन गणगटे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद थोरात, उद्योजक धैर्यशील गोंदील, शिवाजी कदम यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी कारंडे यांनी धावपळीच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, आहार, औषधोपचार यांची माहिती दिली.

  यावेळी नटराज कदम, सचिन गणगटे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते बजरंग गावडे, सर्वजीत कदम, ऑक्सीजन व्यायाम शाळेचे प्रमुख सचिन थोरात, महेश कदम, तेजस तोडकर, तनवीर लांडगे, अनिकेत गणगटे, सुमित खटावकर, नंदन खटावकर, रोहित गणगटे, अखिल व निखिल थोरात, टायगर मंडळाचे सर्व कार्यकर्ते, हनुमान ग्रुप चे कार्यकर्ते, अंबामाता व भगतसिंग ग्रुप चे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. नटराज कदम यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक गणगटे यांनी केले.

Related posts: