|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बारामतीत 33 टँकरव्दारे पाणीपुरवठा

बारामतीत 33 टँकरव्दारे पाणीपुरवठा 

प्रतिनिधी/ बारामती

बारामती तालुक्यातील तब्बल 22 गावे व 273 वाडय़ा-वस्त्यावरील सुमारे 64 हजार लोकसंख्येला 33 टँकरव्दारे पाणी पुरविले जात आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून पावसाळा अजून एक महिना दूर आहे. बारामती तालुक्यात यंदाही टँकरचे अर्धशतक पार पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बारामती तालुक्यात जिरायती भागात दुष्काळाची तीव्रता कमालीची वाढली आहे, तर बागायती भागातही उन्हाच्या तीव्रतेने विहिरी बोअरचे पाणी अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे उभी पिके करपू लागली आहेत. तसेच जिरायती भागात प्यायला पाणी नाही, तसेच जनावरांचे देखील हाल होत असून पाण्याविना शेतातील पिकेही आता करपू लागली आहेत. अशा दृष्ट चक्रात येथील शेतकरी अडकला असून उन्हाळ्याचा आणखी एक महिना काढायचा कसा?, असा यक्षप्रश्न येथील लोकांपुढे उभा राहिला आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत पावसाला सुरूवात होत नाही. एप्रिल महिना कसा-बसा जाईल; पण त्यानंतर पूर्ण मे महिना आणि जूनचा पंधरवडा काढताना नागरिकांच्या नाकी नऊ येणार आहेत. सध्या तालुक्यातील 22 गावे 273 वाडय़ा-वस्त्यावरील सुमारे 64 हजार लोकसंख्येला 33 टँकरव्दारे पाणी पुरविले जात आहे. या टँकरमध्ये 4 शासकीय तर 29 खाजगी टँकरचा समावेश आहे. तसेच शंभरपेक्षा अधिक खासगी टँकरचाही समावेश असून शंभरपेक्षा अधिक खेपा करत पाणीपुरवठा केला जात आहे.

सुपे, तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, कारंडेमळा, मुटी, सोनवडीसुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काऱहाटी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, कारखेल, भिलारवाडी, जळगाव-सुपे, बाबुर्डी, गाडीखेल, वढाणे, मोढवे, उंडवडी, कडेपठार, खराडेवाडी, आंबी खुर्द, भोंडवेवाडी, अंजनगाव, लोणीभापकर, मुढाळे, जोगवडी, निंबोडी, मासाळवाडी, नारोळी, कटफळ, साबळेवाडी,
कऱहावागज, जराडवाडी, जैनकवाडी, सावळ, दंडवाडी, पारवडी या गावांना व वाडय़ावस्त्यांना टँकरव्दारे पाणी पुरविले जात आहे. ही परिस्थिती जर अशीच राहिली तर मात्र दुष्काळाचे मोठे संकंट ओढावणार आहे.

Related posts: