|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » प्रियांका गांधी चोराच्या पत्नी : उमा भारती

प्रियांका गांधी चोराच्या पत्नी : उमा भारती 

ऑनलाईन टीम / भोपाळ :

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींवर निशाणा साधला आहे. उमा भारती म्हणाल्या, प्रियांका गांधी या चोराच्या पत्नी आहेत. संपूर्ण जनता त्यांना याच नजरेने पाहणार, उमा भारती प्रचारासाठी छत्तीसगडमधील दुर्ग लोकसभा मतदार संघात गेल्या होत्या. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

दुर्ग येथे प्रचारासाठी गेलेल्या उमा भारती यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रियांका गांधी यांच्या राजकारणात सक्रीय होण्याबाबत, तसेच गांधी लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांबाबत उमा भारती यांना विचारले असता त्या म्हणाल्या, त्यांच्या पतीवर चोरीचा आरोप आहे, त्यामुळे चोराच्या पत्नीकडे ज्या नजरेने पाहिले जाते, त्याचप्रकारे हिंदुस्तान प्रियांका गांधीकडे पाहणार आहे.

प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांबाबत भारती म्हणाल्या, भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणताही इच्छूक उमेदवार कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढू शकतो.

भारती यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांच्य्ाावर निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईबाबत विचारले असता भारती म्हणाल्या की, “निवडणूक आयोगाने योगी आणि आजम खान या दोघांना समान दंड सुनावला आहे. परंतु दोघांच्य्ााही अपराधंमध्ये खूप फरक आहे.”

Related posts: