|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. शरद साठे यांचे निधन

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. शरद साठे यांचे निधन 

 

 पुणे / प्रतिनिधी:  ग्वाल्हेर घराण्याचे ज्ये÷ गायक, संगीततज्ञ सप्रयोग भाष्यकार पं. शरद साठे यांचे बुधवारी पुण्यात निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.

सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. पंडित द. वि पलुस्कर, प्रा. बा. र देवधर, तसेच पंडित शरदचंद्र आरोलकर अशा दिग्गज गुरूंचे सानिध्य त्यांना लाभले. ख्याल, टप्पा आणि तराणा अशा गायनप्रकारांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे सुयोग्य विश्लेषण व अभ्यासपूर्ण सांगीतिक लिखाण अशा अनेक पैलूंनी त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध झाले आहे. ते उत्तम सुलेखनकार असल्याने ‘लिंटास’सारख्या जाहिरात संस्थेच्या माध्यामातून त्यांनी या क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले आहे.

विविध पुरस्कारांनी सन्मानित

‘संगीत रिसर्च अकादमी’, ‘पंडित विनायकबुवा पटवर्धन सन्मान’, ‘संगीतरत्न काशी- संगीत’, ‘पं. जानोरीकर संगीत भूषण पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. देश विदेशातील मैफलीसोबत ‘टप्पा’ या प्रकारावर त्यांनी दिलेली व्याख्याने अभ्यासकांना उपयुक्त ठरली आहेत.