|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » प्रकाश आंबेडकर, असुद्दीन ओवेसी यांची पुण्यात सभा

प्रकाश आंबेडकर, असुद्दीन ओवेसी यांची पुण्यात सभा 

पुणे / प्रतिनिधी :

वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर व एम.आय.एम.चे नेते, खासदार असुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा रविवार दि. 21 एप्रिल रोजी दुपारी 2 वा. एस.एस.पी.एम.एस. ग्राऊंड, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी लक्ष्मण माने यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकतर्फे उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती आघाडीचे नवनीत अहिरे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस आणि भाजपा यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण राज्यभर उमेदवार उभे केले असून याचअनुशंघाने कार्यकर्त्यांना व नागरिकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतुने ही सभा आयोजित करण्यात आली आहे. भारिप चे शहर अध्यक्ष अतुल बहुले, एम.आय.एम चे शहराध्यक्ष लियाकत शेख यांनी या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.