|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून 

 पुणे / वार्ताहर :

प्रियेसीला भेटायला आलेल्या तरुणाच्या डोक्मयात कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना ढोरेनगर, सांगवी येथे मंगळवारी रात्री उशीरा घडली.

अशोक लक्ष्मण बिरादार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर लक्ष्मण तुकाराम खुटेकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरूबाळाप्पा बिरादार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत अशोक हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याची ओळख लक्ष्मण याच्या पत्नीशी झाली. त्यानंतर ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. अशोक याचे तिच्या घरी येणे जाणे वाढले. हा प्रकार लक्ष्मण याच्या लक्षात आला. मंगळवारी रात्री मृत अशोक हा लक्ष्मण याच्या घरी आला. त्यावेळी लक्ष्मण हा घरीच होता. त्यावेळी लक्ष्मण याने रागाच्या भरात त्याच्या डोक्मयात कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी करत त्याचा खून केला