|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » शंभर वेळा आंघोळ केली तरी कुमारस्वामी रेडय़ासारखेच दिसणार

शंभर वेळा आंघोळ केली तरी कुमारस्वामी रेडय़ासारखेच दिसणार 

ऑनलाईन टीम / बेंगळूरु :

कुमारस्वामी यांनी शंभर वेळा आंघोळ केली तरी ते रेडय़ासारखे काळेच दिसणार, अशी वादग्रस्त टीका भाजपा आमदार राजू कागे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्यावर केली आहे. काही दिवसांपूर्वी कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना राजू कागे यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र, कागे यांच्या या वक्तव्याने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात तनावाचे वातावरण आहे.

राजू कागे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे वर्णभेदावर भाष्य आहे. त्यामुळ कागे यांच्यावर कारवाईही होऊ शकते. मंगळवारी एचडी कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. कुमारस्वामी म्हणाले होते की, मोदी रोज सकाळी उठतात आणि चेहऱयावर चमक आणण्यासाठी मेकअप करतात. नंतर कॅमेरेच्या समोर येतात. कारण मीडीया फक्त नरेंद्र मोदी यांना दाखवत. याला कागे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.