|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » सौदी अरेबियात दोन भारतीयांचा शिरच्छेद

सौदी अरेबियात दोन भारतीयांचा शिरच्छेद 

ऑनलाईन टीम / सौदी अरेबिया :

आपल्याच भारतीय सहकाऱयाची हत्या केल्याप्रकरणी दोघांचा सौदी अरेबियाच्या सरकारने शिरच्छेद केला. 28 फेब्रुवारीला दोघांचा शिरच्छेद करण्यात आला. मात्र, शिरच्छेद झाल्यावर सौदी प्रशासनाने यासंदर्भात भारत सरकारला कळवले नव्हते.

होशियारपूरच्या सत्विंदर कुमार आणि लुधियानाच्या हरजीत सिंग यांचा शिरच्छेद करण्यात आला आहे. हरजीत, सत्विंदर आणि इमामुद्दीन या तिघांनी सौदीतील महामार्गावर लुटमार केली होती. त्यामधील पैशांच्या वाटपावरून तिघांमध्ये भांडण झाले. त्या भांडणातून त्यांनी इमामुद्दीनची हत्या केली. काही दिवसांनंतर हरजीत सिंग आणि सत्विंदर कुमार यांना दारू पिऊन मारामारी केल्याप्रकरणी सौदी पोलिसांनी अटक केली होती. त्यांना भारतात परत पाठवण्याचीच तयारी सुरु असताना इमामुद्दीन या त्यांच्या भारतीय सहकाऱयाची हत्या केल्याचे उघडकीस आले.