|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसशिवाय दुसरे बटन दाबल्यास करंट बसेल : लखमा

काँग्रेसशिवाय दुसरे बटन दाबल्यास करंट बसेल : लखमा 

ऑनलाईन टीम / रायपूर :

मतदारांना भीती घातल्याबद्दल निवडणूक आयोगाकडून कवासी लखमा यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. कवासी लखमा हे छत्तीसगड सरकारमधील मंत्री आहेत. मतदारांनी काँग्रेसशिवाय इतर कोणतेही बटन दाबले, तर त्यांना इलेक्ट्रीक शॉक बसेल, अशी भीती लखमा यांनी मतदारांना घातली होती.

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बिरेश ठाकूर हे कनकेर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकूर यांच्या प्रचारसभेत मतदारांना मतदानाचे आवाहन करताना त्यांनी हे वक्तव्य केले. बिरेश ठाकूर यांचे बटण पहिल्या क्रमांकाचे आहे. त्यामुळे पहिल्याच क्रमांकाचे बटण दाबा, जर दुसऱया क्रमांकाचे बटण दाबले तर तुम्हाला इलेक्ट्रीक करंट बसेल, अशी भीती लखमा यांनी मतदारांमध्ये घातली होती.