|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » leadingnews » लोकसभेच्या दुसऱया टप्प्यातील मतदानाला सुरूवात

लोकसभेच्या दुसऱया टप्प्यातील मतदानाला सुरूवात 

राज्यातील 10 जागांवर आज मतदान, अनेक दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

ऑनलाईन टीम / पुणे :

लोकसभेच्या दुसऱया टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू-काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी अशा 13 राज्यांतील 97 जागांवर आज मतदान होत आहे. राज्यातील 10 जागांवर मतदान सुरू आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यातील 10 जागांवर झालेले मतदान पुढील प्रमाणे ः

अकोला ः गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत सिंह पाटील यांनी सपत्नीक मतदान केले. 9 वाजेपर्यंत येथे 7.56 टक्के मतदान झाले.

लातूर ः लातूरात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 9 वाजेपर्यंत येथे 9 टक्के मतदान झाले.

नांदेड ः जो काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांचा गड मनला जातो. येथे सकाळी 9 वाजेपर्यंत 7 टक्के मतदान झाले आहे. नांदेडमधील लेबर कॉलनीतील तीन मतदान केंद्रे अचानक बदलण्यात आली. त्यामुळे मतदानरांची चांगलीच पळापळ झाली. येथील 6 मतदारसंघातील एकूण 78 मशिनमध्ये बिघाडझाल्याच्या तक्रारी येत आहेत. अशोक चव्हाण यांनी येथे मतदानाचा हक्क बजावला.

सोलापूर ः भाजपचे उमेदवार डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी मतदानाचा हक्क बाजावला. अक्कलकोटमधील गौडगाव येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपले 106 वर्षांचे वडिल महास्वामींचे मौनव्रत असल्याने त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. सोलापूरतात आघाडीचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी मतदान केले. तर राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सहकुटुंब मतदान केले. येथे प्रकाश आंबेडकर, जय सिद्धेश्वर स्वामी आणि सुशील कुमार शिंदे यांच्या कटय़ाची टक्कर आहे.

हिंगोली ः लोकसभेला शिवसेनेचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत पाटील यांनी सपत्नीक मतदान केले.

बीड ः येथे सकाळी 9 वाजेपर्यंत 3.11 टक्के मतदान झाले. येथे प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात लढत आहे. बीडमध्ये प्रितम मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि महाआघाडीचे प्रचाराक रविकांत तुपकर यांनी आपल्या सावळा या मूळ गावी जाऊन मतदान केले.

बुलढाणा ः येथील लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार बळीराम सिरस्कार यांनी अकोल्यातील पारस येथे मतदान केले.

परभणीमध्ये शिवसेनेचा भाजप महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांनी मतदान केले. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी देखील मतदान केले. मतदान केंद्रात थांबण्यावरून परभणीतील मानवत तालुक्यातील शेवडी गावात मतदार आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला.

अमरावतीत युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा कौर यांनी मतदानापूर्वी देवदर्शन करत नंतर मतदानाचा हक्क बजावला.

उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

 

 

Related posts: