|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » देशातील अनेक भागात दुसऱया टप्प्यात उत्साहात मतदान

देशातील अनेक भागात दुसऱया टप्प्यात उत्साहात मतदान 

ऑनलाईन टीम / पुणे :

लोकसभेच्या दुसऱया टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू-काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी अशा 13 राज्यांतील 97 जागांवर आज मतदान होत आहे.

देशातील अनेक भागात होत असलेले मतदान पुढीलप्रमाणे ः

युपीमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 10.76 मतदान झाले आहे. मणिपुरमध्ये 14.99 टक्के, बिहार 9.2 टक्के, तामिळनाडू 13.48 टक्के, कर्नाटक 7.54 टक्के छत्तीसगढ 13.4 टक्के, मतदान अत्तापर्यंत नोंदविण्यात आले आहे.

आज दुसऱया टप्प्यात उत्तरप्रदेशातील 8 जागांवर मतदान होत आहे. उत्तर प्रदेशात मतदारांनी सकाळपासूनच केंद्राबाहेर मोठय़ा रांगा लावल्या होत्या.

तामिळनाडूत दुसऱया टप्प्यात 14 जागांवर मतदान आज होत आहे. डीएमकेचे नेता एमके स्टालिन आणि अंबाझगन यांनी मतदानाचा हक्क बजावला. तामिळानाडूमध्ये डीएमके नेता कनिमोझी यांनी चेन्नईत मतदान केले. मतदानानंतर त्यांनी बोलताना सांगितले, छापे टाकून आज विरोधी पक्षातील लोकांना हैराण केले जात आहे. एआईएडीएमकेला भाजपने पूर्णपणे आपल्या जाळ्यात घेतले आहे. असे त्यांनी नमूद केले. अभिनेते आणि मक्कल नीधि मय्यमचे अध्यक्ष कमल हसन आणि त्यांची मुलगी श्रुती हसन यांनी रांगेत उभे राहुन मतदान केले. तसेच काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी शिवगंगा येथून मतदान केले. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.

कर्नाटकात मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि त्यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी यांनी रामनगरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल मांडय़ा हे जेडीएस-र्कॉग्रेसचे उमेदवार आहेत. कर्नाटकात आज 14 जागांवर मतदान होत आहे. बेंगळूरमध्ये अपक्ष उमेदवार प्रकाश राज यांनी मतदान केले. तर येथून भाजपकडून तेजस्वी सूर्या तर र्कॉग्रेसकडून बीके हरिप्रसाद निवडणुकीला उभे आहेत.

अखिलेश यादव यांनी आज आपला मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर ते म्हणाले, लोकशाहीत एक दिवासाचे मतदान पाच वर्षेच नव्हे तर येणाऱया काळाची दिशा ठरवतो. लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करा असे अवाहन यादव यांनी यावेळी केले.

बिहारमध्ये भागलपुर भागात सकाळी 8 वाजल्यापासून 7 टक्के मतदान झाले. सकाळी 8पर्यंत बांकामध्ये 4 टक्के, किशनगंज 3.5 टक्के, आणि कटिहारात 4 टक्के मतदान झाले.

पुडुचेरीत उपराज्यपाल किरण बेदी पुडुचेरीत रांगेत उभे राहुन मतदान केले. केंद्रशाशित पुडुचेरी एका लोकसभेच्या जागेसाठी मतदान होत आहे. येथे काँग्रेस-डीएमके गठबंधन आणि एआईएडीएमके-भाजप गठबंधन आहे.

दुसरा टप्प्यात कोणत्या राज्यात किती मतदारसंघ (97)

आसाम – 5

बिहार – 5

छत्तीसगड – 3

जम्मू काश्मिर – 2

कर्नाटक – 14

महाराष्ट्र – 10

मणिपूर – 1

ओडिसा – 5

तामिळनाडू – 39 (सर्व)

त्रिपुरा – 1

उत्तर प्रदेश – 8

पश्चिम बंगाल – 3

पुदुच्चेरी – 1

Related posts: