|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » पश्चिम बंगालमधील रायगंजमध्ये मतदानावेळी हिंसा

पश्चिम बंगालमधील रायगंजमध्ये मतदानावेळी हिंसा 

ऑनलाईन टीम / पश्चिम बंगाल :

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी, दार्जीलिंग आणि रायगंज येथे मतदानाच्यावेळी मोठी हिंसा झाली आहे. रायगंजमधील इस्लामपुरमध्ये सीपीएमचे नेते सलीम यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात समील यांना कोणतीही इजा झाली नाही. या आधी येथील लोकांच्या गर्दीने पत्राकारांवर देखील हल्ला करत प्रसारमाध्यमांचे कॅमेऱयाची तोडफोड केली. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी सुरक्षारक्षकांना अश्रू गॅसचा देखील वापर करावा लागला आहे. पत्रकारांच्या हल्ल्यात सत्ताधारी पक्षातील टीएमसी कार्यकर्ते देखील होते.

ही हिंसा पसरविणाऱयांनी स्थानिक लोकांना मतदानापासून थांबवले आहे असे देखील बोलले जात आहे. त्यानंतर लोकांनी राष्ट्रीय सुरक्षामहामार्ग अडवला ही घटना इस्लामपूरच्या दिनाजपुर येथील छोपरामध्ये झाली आहे. हिंसा झाल्याने येथील स्थानिक लोक मतदान करण्यास घाबरले आहेत. पोलिसांनी मतदारांकडे जाऊन त्यांना सुरक्षा देण्याचा दावा केला आहे.  

Related posts: