|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.63 टक्के मतदान

राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.63 टक्के मतदान 

ऑनलाईन टीम / पुणे :

लोकसभेच्या दुसऱया टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू-काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी अशा 13 राज्यांतील 97 जागांवर आज मतदान होत आहे. राज्यातील 10 जागांवर मतदान सुरू आहे.

राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.63 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील अनेक भागात झालेले मतदान पुढीलप्रमाणे : बुलडाणा – 46 टक्के, अकोला – 45 .39 टक्के, अमरावती – 45.63 टक्के, हिंगोली – 49.13 टक्के, नांदेड – 50.4 टक्के, परभणी – 45.53 टक्के, बीड – 46.29 टक्के, उस्मानाबाद – 46.13 टक्के, लातूर – 44.10 टक्के, सोलापूर – 45 टक्के

राज्यात झालेले  एकूण मतदान – 46.63 टक्के

Related posts: