|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीविरुद्ध याचिका

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीविरुद्ध याचिका 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात येऊ नये, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. भोपाळमधून त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी मिळण्यापूर्वी तब्येतीचे कारण पुढे करत एनआयए कोर्टाकडून जामीन मिळवला आहे. त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. नासीर अहमद सय्यद बिलाल यांनी ही याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्वजिय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपाकडून काल मध्यप्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी निवडणूक लढण्यास तयार असून या कामाला सुरुवात केल्याचे म्हटले आहे