|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » देश लुटणाऱयांना हद्दपार करा

देश लुटणाऱयांना हद्दपार करा 

 प्रतिनिधी /देवरुख:

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी सध्या तोंडाला येईल ते बरळत आहेत. ज्या सावरकरांनी देशासाठी बलीदान दिले त्या सावरकरांना नालायक कार्ट राहूलने  डरपोक म्हणाव हे आम्ही सहन करणार नाही. स्वातंत्र्य लढय़ाशी राहुल यांचा काय संबध असा सवाल करत 60 वर्षे देश लुटणाऱया दरोडेखोर काँग्रेसला पुन्हा थारा देऊ नका असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी देवरूख येथील जाहीर सभेत केले. यावेळी राणे कुटुंबीयांवरही जोरदार हल्ला चढवताना शिवसेनेच्या पाठेशी राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

राहूल गांधी म्हणतात नेहरुंनी हे केले, ते केले. नेहरूंचे योगदान आम्ही नाकारत नाही. मात्र त्यांना वीर जवाहरलाल असे का म्हणत नाहीत असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. निवडणुक आली की राहूल व सोनिया गांधी यांना देव मंदीर आठवते. गेल्या साठ वर्षात काँग्रसने देश लुटून आपल्या तुंबडय़ा भरल्या मात्र त्यांचे पोट अजूनही भरलेले नाही. दरोडे आणि घोटाळे हेच यांचे कर्तृत्व असून अशा लोकांना पुन्हा थारा मिळू नये यासाठीच युती केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ठाकरे यांनी राणेवरही हल्ला चढवला. उमेदवाराच्या शिक्षणाबरोबर संस्कार महत्वाचे ठरतात. त्यांनी परदेशात डिग्री घेतल्या असतील पण संस्कार कीठे आहेत. आमचे उमेदवार विनायक राऊत यांचे शिक्षण त्यांच्यापेक्षा कमी असेल पण संस्कारी व सुशिक्षीत आहेत. ज्याच्या घरातच वेगवेगळय़ा निष्ठा आहेत, ते मतदारांशी काय निष्ठा ठेवणार असा सवालही त्यांनी केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात कोणीतरी झेंडय़ाच दुकान उघडल्याच ऐकलय, बापाकडे एक झेंडा मुलांकडे वेगवेगळे झेंडे अशी यांची स्थिती आहे. नातवंडे थोडी लहान असल्याने त्यांच्या हाती अद्याप झेंडा नाही. वेगवेळय़ा निष्ठा दाखवणारे मतदारांचे काय भले करणार असा सवाल करत आमचे उमेदवार राऊत सेनेशी एकनिष्ठ असून त्यांनाच पुन्हा विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. 

Related posts: