|Saturday, February 29, 2020
You are here: Home » leadingnews » जातीवर बोलता, मग दलितांवरील अन्यायावर मोदींचे मौन का? राज ठाकरे

जातीवर बोलता, मग दलितांवरील अन्यायावर मोदींचे मौन का? राज ठाकरे 

 

 पुणे / प्रतिनिधी :  पंतप्रधान आता जातीचे कार्ड खेळत आहेत. आता जात आठवते. मग मागच्या पाच वर्षांत दलितांवर अन्याय झाला, त्यावेळी का मौन बाळगले, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

खडकवासला येथील प्रचारसभेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीसाठी मोदी जातीचा वापर करीत आहेत. आपण मागासलेल्या जातीतील असल्याचे सांगत आहेत. आम्ही जातीवरून त्यांच्यावर टीका करत नाही. मात्र, जातीबाबत बोलणारे मोदी गुजरातमधील उणा येथे दलित बांधवांवर झालेल्या अन्यायाबाबत, अत्याचाराबाबत का बोलत नाहीत, हा माझा त्यांना सवाल आहे. माझे काही जैन मित्रही बिफच्या व्यवसायात आहे, असे एका मुलाखतीत मोदी सांगतात. मग, त्या निरपराध तरुणांना का मारले, याचे उत्तर द्यावे.

पाच वर्षापूर्वी देशाला मोदी यांनी स्वप्ने दाखविली. देशातल्या शेतकरी, कामगार, तरुणांना सांगितल्या. आज पाच वर्षांनंतर हा माणूस चकार शब्द काढायला तयार नाही. निवडणुकीचा प्रचार भलतीकडेच नेत आहेत. सत्तेत आल्यावर मोदींची भाषा बदलली आहे, अशी टीका त्यांनी केली.

उत्तर भारतात चार सभांची मागणी

मोदी आणि शहांविरुद्ध जो प्रचार करत आहेत, तो देशभर जात आहे. त्यामुळे आता उत्तर भारतातही चार सभांची मागणी आहे. हिंदीमधून सभा घ्या, असे मला सांगितले जात आहे. मला पटकन हिंदीमध्ये लवकर शिवीही देता येत नाही. त्यामुळे मी येथेच बरा आहे, अशी कोटीही ठाकरे यांनी केली.

 

Related posts: