|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » उद्योग » विदेशात नोकरी करणाऱया भारतीयांना टीडीएसचा दिलासा

विदेशात नोकरी करणाऱया भारतीयांना टीडीएसचा दिलासा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ला

भारतीय व विदेशी कंपन्यांतील करारांतर्गत विदेशात डेप्युटेशनवर नोकरी करणाऱया कर्मचाऱयांच्या पगारातून प्राप्तिकर कायदा 195 व्या कलमानुसार टीडीएस कापण्याची आवश्यकता नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. यामुळे विदेशात नोकरी करणाऱया असंख्य भारतीयांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

विदेशात नोकरी करत असणाऱया अनिवासी कर्मचाऱयांच्या पगारातून टीडीएस कापण्याचा समावेश या कलमात आहे. पण भारतीय आणि विदेशी कंपनीत झालेल्या मनुष्यबळ करारांतर्गत विदेशात नोकरी करणाऱया कर्मचाऱयास हे कलम लागू करण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान स्पष्ट केले आहे. संबंधित कंपनी विदेशी नियमन आणि नियंत्रण याद्वारे टीडीएस कापण्याची गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

टीडीएस विरोधात प्रकरण न्यायालयाकडे

रेडियण्ट सर्व्हिसेस आणि कुवेतच्या अरबी एनर्टेक या कंपनीत मनुष्यबळ करार झाला होता. यात भारतीय कर्मचाऱयांना साडेपाच हजार डॉलर पगार देण्याचे करारांतर्गत ठरले होते. मात्र, कंपनीने टीडीएस कापून चार हजार डॉलर पगार कर्मचाऱयांना दिला. त्यामुळे याविरोधात हे प्रकरण न्यायालयात आले.

Related posts: