|Friday, October 18, 2019
You are here: Home » leadingnews » सेना-भाजप युती लाचारीतून : राज ठाकरे

सेना-भाजप युती लाचारीतून : राज ठाकरे 

ऑनलाईन टीम / रायगड :

नाणार रद्द होणार पण मी तुम्हाला सांगतो बे सावध राहू नका दोन्ही पक्ष दोन महिन्यांपूर्वी काय बोलत होते, अनेकांना वाटले यांची युती होणार नाही. योग्य वेळी युती करणार ते माहिती होते कारण दोघेही लाचार आहेत. सत्तेसाठी तुमचा विचार करणार नाहीत. सत्ता आणि पैशासाठी भाजप-सेना युती झाली आहे. रस्ते होणे म्हणजे नुसती प्रगती नाही. फक्त कोकण सर्व महाराष्ट्र जगवू शकतात, इतकी कोकणात ताकद आहे. पाच वर्षे देश दोन माणसे चालवतात मध्ये वेळ मिळाला तर अरूण जेटली यांना बोलवतात. महाराष्ट्रातील एक वैमानिक ज्याने स्वतःचे विमान बनवले अमोल यादव सरकारने याच्यासोबत 35 हजार कोटी रूपये आणि पालघरला जमीन देतो. परंतू काही दिले नाही. काही क्लिप सर्व सभांसाठी ठेवल्या आहेत. मतदान होईपर्यंत त्या डोक्यात फिट व्हाव्यात यासाठी त्या दाखवतोय. नेटवर मोदी भक्त मनोरूग्ण 2014 पासून ते वाटेल त्या गोष्टी ढकलत आहेत. त्यामुळे ते नेटवरून त्या गोष्टी क्लिप काढत आहेत. पण मी 6 महिन्यांपासून काढत आहे. त्यावेळी त्यांना कळाले नाही आपण जे बोलतोय ते रेकॉर्ड होते. त्यांना वाटले आता कोण लक्षात ठेवतो, पण आम्ही आहोत.

मोदींच्या दत्तक गावाची पोलखोल

सर्व तरूणांचा स्वप्न भंग झाला आहे. नोटाबंदी फसली,तर भाजपकडे पैसा आला कोठून असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. एका आठवडय़ात साडे आठलाख संडास म्हणजे एका मिनिटाला 34 आणि सेकंदाला 7 संडास शक्य आहे काय, मोबाईल, इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी आली ती राजीव गांधी यांच्या काळात, ते जर त्यावेळी आले नसते तर तुम्हाला खोटा डिजिटल प्रचार कोठून करता आला असता. मोदींनी घेतलेल्या दत्तक गावात कोणतेही काम झालेले नाही. स्वतःच्या गावाकडे पाहू शकला नाही तर ते तुमच्याकडे काय पाहणार. याबाबतचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरे यांनी मोदींची पुन्हा एकदा पोलखोल केली.