|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सत्तेसाठी ममतांचा पाठिंबा घेणार नाही : काँग्रेस

सत्तेसाठी ममतांचा पाठिंबा घेणार नाही : काँग्रेस 

नवी दिल्ली

 लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर केंद्रात सत्ता स्थापण्यासाठी काँग्रेस पक्ष ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे समर्थन मागणार नाही, असे वक्तव्य पश्चिम बंगाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांनी केले आहे. ममता बॅनर्जी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या पाठिराख्या असल्याचा आरोपही मित्रा यांनी केला आहे.