|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » घरगुती गॅस रिक्षात भरताना दोघांना अटक

घरगुती गॅस रिक्षात भरताना दोघांना अटक 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

ब्रम्हपुरी परिसरात घरगुती गॅसचा काळाबाजार करुन, गॅस अवैधपणे रिक्षामध्ये भरत असताना एक रिक्षासह घरगुती सिलिंडर, विद्युत मोटार, वजन काटा असा 2 लाख 16 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली. विजय बापूराव देसाई (वय 47), अतुल सुरेश मोहिते (वय 35, दोघे रा. ब्रम्हपुरी) अशी त्याची नावे आहेत.

 विजय देसाई याने अवैधपणे घरगुती गॅस सिलिंडरचा साठा केला आहे. या घरगुती गॅसचा वापर तो बेकायदेशिरपणे तीन चाकी रिक्षामध्ये करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देसाईच्या बेकायदा गॅस पंपावर छापा टाकला. त्यावेळी तो अतुल मोहिते या रिक्षा चालकाच्या रिक्षामध्ये बेकायदेशिरपणे विद्युत मोटारीच्या सहाय्याने घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस भरत असताना पोलिसांनी एक रिक्षासह पाच घरगुती सिलिंडर, विद्युत मोटार, वजन काटा असा 2 लाख 16 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Related posts: