|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शाळेत नि : शुल्क पोहण्याचा सराव

शाळेत नि : शुल्क पोहण्याचा सराव 

प्रतिनिधी/ सातारा

सध्या शाळांना सुट्टय़ा लागल्यामुळे सर्वत्र पोहण्याचे क्लासेस सुरू झालेले आहेत. शहरी भागात भरमसाठ शुल्क आकारणी करून मुलांना पोहणे शिकवले जात आहे. विविध ठिकाणचे तलाव आता गर्दीने फुलून गेले आहेत, परंतु यामध्ये अनेकजण मालामाल देखील होत आहेत. मात्र, सावंतवाडी तालुका (जि. जावळी) सातारा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक शिवाजी शिवणकर हे तेथील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून पोहण्याचे धडे देताहेत, त्यामुळे अनेक शाळांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असा अनोखा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.

सध्या सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टय़ा सुरू झाले आहेत. त्यामध्ये शहरी भागात पोहण्यासाठी काही साधने उपलब्ध नसल्यामुळे अनेक जण तलावावर गर्दी करु लागल्या आहेत. येथील शाहू स्टेडियममध्ये एकमेव तलाव उपलब्ध असल्यामुळे तेथे अनेकांनी गर्दी केली आहे. तेथे महिन्याचे शुल्क 800 रुपये घेतले जाते, तर सातारच्या सैनिक स्कूलमध्ये मुलांना पोहण्याचे धडे देण्यासाठी पालकांकडून अधिक शुल्क आकारले जाते. हे सर्व सुरू असताना जिल्हा परिषदेसारख्या ग्रामीण भागातील शाळेत स्वतः मुख्याध्यापक शिवाजी शिवणकर यांनीच आपल्या मुलांना पोहण्याचे धडे देण्याचे ठरवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी उषा शिवणकर याही मदत करताना दिसत आहेत.