|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » साध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे

साध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :  साध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हणून त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांची पाठराखण केली आहे.

मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूच्या दिवशी माझे ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवसापासून सुरू झालेले सुतक मिटले, असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी व भोपाळमधील भाजपच्या लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. दरम्यान, साध्वी यांच्या या वक्तव्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, हेमंत करकरे हे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले हे मान्य आहे. पण साध्वी प्रज्ञा सिंह यांचा तुरुंगात छळ झाला होता. त्यांना तुरुंगात ज्या यातना दिल्या गेल्या, अपमान केला गेला, तो कुठल्याही कायद्यात बसत नाही. त्यामुळे साध्वी यांनी केलेल्या वक्तव्यामागील त्यांची व्यथा समजून घेतली पाहिजे.’’