|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल

मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेने केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने हा गुन्हा दाखल केला आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना दोन दिवसांपूर्वी नोटीस पाठविण्यात आली होती. जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे विधान त्यांनी भुलेश्वर येथील भाषणात केली होती. या विरोधात तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि 171 आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल भादंवि 125 या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.