|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » मुंबईतील मनसेच्या सभांना शिवसेनेकडून आडकाठीचा प्रयत्न

मुंबईतील मनसेच्या सभांना शिवसेनेकडून आडकाठीचा प्रयत्न 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईत सभा घेण्यास शिवसेनेने आडठकाठी करण्याचाप्रयत्न सुरु केला असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली आहे. 24 तारखेला राज ठाकरेंची मुंबईत सभा होणार आहे. मात्र अजूनही या सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही.

निवडणुकीच्या काळात सभेच्या परवानगीसाठी असलेली एक खिडकी यंत्रणा आणि मुंबई महानगरपालिकेकडून परवानगीसाठी टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. 18 तारखेला राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीसाठी प्रयत्न केला असता मनसेचा कोणताही उमेदवार निवडणुकीला उभा नसल्याने त्यांनी महानगरपालिकेकडून परवानगी घ्यावी असे निवडणूक अधिकाऱयांकडून सांगण्यात आले आहे. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनी आम्ही परवानगी देऊ शकत नाही असे सांगितले आहे, अशी माहिती मनसे नेते संजय नाईक यांनी दिली आहे.

मुंबईतील शिवडी परिसरात राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळताच शिवसेनेकडून 18 तारखेला अर्ज करुन शिवडी परिसरातील चार मैदाने आरक्षित करण्यात आली, असा आरोपही मनसेकडून करण्यात आला आहे. तसेच परवानही मिळाली नाही तरी सुद्धा मनसेची सभा होणारच अशी भूमिका मनसेकडून घेण्यात येत आहे.