|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला खिंडार

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला खिंडार 

ऑनलाईन टीम / रत्नागिरी :

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला उत्तर रत्नागिरीत खिंडार पडले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसह 18 पदाधिकाऱयांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले असतानाच पदाधिकाऱयांनी पक्ष सोडल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना चांगला धक्का बसला आहे. स्वाभिमानचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, गुहागर व खेड तालुकाध्यक्षांसह 18 पदाधिकाऱयांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि खासदार विनायक राऊत, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱयांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.