|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » लंगोट बांधून का पळून गेले?

लंगोट बांधून का पळून गेले? 

 

 ऑनलाईन टीम / पंढरपूर :  दादांच्या मांडय़ा काढणारे लंगोट बांधून का पळून गेले, पायाखालची वाळू सरकू लागल्याने देशाचे नेते गल्लीतल्या राजकारणावर उतरले’, अशा शब्दात काल रात्री झालेल्या अकलूज येथील सभेत जयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले. जयसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह पाटील यांचे धाकटे बंधू होत. नातेपुते येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत 50 वर्षाचे सहकारी असणाऱया विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर शरद पवार यांनी अतिशय टोकाची टीका केल्याने मोहिते समर्थक संतप्त होते. मात्र यावर थेट प्रतिक्रिया देण्यास मोहिते पाटील यांनी टाळले होते.