|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेस अध्यक्षांनी परवानगी दिली तर वाराणासीतून लढायला आवडेल

काँग्रेस अध्यक्षांनी परवानगी दिली तर वाराणासीतून लढायला आवडेल 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी परवानगी दिली तर मला वाराणासीतून लढायला आवडेल, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे प्रियांका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणासीतून लढण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.

प्रियांका गांधी यांनी यापूर्वीही वाराणासीतून लढण्याचे संकेत दिले होते. त्यावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी प्रियांका यांना वाराणासीतून लढण्याचं आव्हान दिलं होतं. प्रियांका यांनी वाराणासीतून लढण्याची हूल देऊ नये. त्यांनी खरोखरच वाराणासीतून लढावं, असं आव्हान अमित शहा यांनी दिलं होतं. त्यावर प्रियांका यांना प्रसारमाध्यमांनी तुम्ही वाराणासीतून लढणार का? असा सवाल केला असता काँग्रेस अध्यक्षांनी परवानगी दिल्यास वाराणासीतून लढायला मला आनंदच वाटेल, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, प्रियांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदी हे देशातील सर्वात कमकुवत पंतप्रधान आहेत, अशी टीका त्यांनी केली. ज्यांकडे राजकीय इच्छाशक्ती असते, ते लोक जनतेला घाबरत नाहीत. ते कमकुवत पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडे आत्मशक्ती नाही. कमकुवत आणि कमजोर असल्यामुळेच ते 56 इंचाची छाती असल्याच्या बाता मारतात, असा घणाघातही त्यांनी केला.