|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » चंद्रकांत कुलकर्णी झाले स्वप्नीलचे काका

चंद्रकांत कुलकर्णी झाले स्वप्नीलचे काका 

श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहे. स्वप्नीलच्या काकाची भूमिका दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी साकारत आहेत. या चित्रपटात ते नाटय़दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या काकाची भूमिका ते साकारत आहेत. हे सुनीलच्या खूप जवळचे आणि मैत्रीपूर्ण असे पात्र आहे. दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटात सुद्धा एका दिग्दर्शकाचीच भूमिका साकारली आहे.

‘पैशांनी श्रीमंत होणं सोपं, नात्यांनी समफद्ध होण कठीण’ या टॅगलाइनसह नुकतेच एक पोस्टर प्रकाशित केले आहे. त्यात स्वप्नील आणि चित्रपटात त्याचे काका झालेले चंद्रकांत कुलकर्णी हे स्कूटरवर स्वार झाले आहेत. त्यांची केमिस्ट्री त्यातून व्यक्त होते.

सिनेमा आणि नाटय़सफष्टीत माझी ओळख एक दिग्दर्शक म्हणूनच आहे. ज्यावेळी कोणताही दिग्दर्शक किंवा लेखक एखादा मराठी चित्रपट करत असतो आणि त्याला एखाद्या भूमिकेविषयी असा ठाम विश्वास वाटतो की ही भूमिका फक्त चंद्रकांत कुलकर्णीच करू शकतात त्याचवेळी मी ती भूमिका करतो. तसचं काहीसं मोगरा फुलला या चित्रपटाच्या बाबतीत झाले आहे, असे चंद्रकांत कुलकर्णी सांगतात.