|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » देश कणखर नेतृत्वाच्या हातात देण्यासाठी निंबाळकरांना विजयी करा : मुख्यमंत्री

देश कणखर नेतृत्वाच्या हातात देण्यासाठी निंबाळकरांना विजयी करा : मुख्यमंत्री 

प्रतिनिधी/ कुर्डुवाडी

देशाची आन, बान, शान कोण उंचावर नेऊ शकतो याचा निर्णय करण्याची ही वेळ आहे. ही दिल्लीची निवडणूक आहे, गल्लीची नाही. देशाचा कारभार कणखर नेतृत्वाच्या हातात देण्यासाठी रणजितसिंह निंबाळकर यांना विजयी करा, तुमच्या मताची ताकद नरेंद्र मोदींना मिळेल. गेली पन्नास-पंचावन्न वर्षे ज्यांच्या हातात सत्ता होती, त्यांनी केवळ अनाचार, दुराचार व भ्रष्टाचाराची मालिका उभी केली. दुसरीकडे मागील पाच वर्षात सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱया योजना आणल्या. देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हिताचे निर्णय, जगासमोर कमजोर नाही तर मजबुत देश दिसला पाहिजे, यासाठी गेल्या पाच वर्षात मोदीजींनी काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कुर्डुवाडी येथे महायुतीचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

  यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, आ. नारायण पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदराव कुलकर्णी, धनाजी साठे, राजाभाऊ राऊत, प्रा.शिवाजी सावंत, शिवाजे कांबळे, अतुल खुपसे, कल्याणराव काळे, राजकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, तालुकाध्यक्ष संजय कोकाटे, धनंजय डिकोळे, महेश चिवटे, विजयकुमार शेटे, रासपचे ज्ञानेश्वर सलगर, आरपीआयचे जिल्हा संघटन सचिव चंद्रकांत वाघमारे, भारतनाना पाटील, संजय पाटील भीमानगरकर, शहराध्यक्ष संजय टोणपे, सुहास शहा, प्रशम कोल्हे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

  फडणवीस म्हणाले, ओपनिंग बॅट्समन जर टिकला नाही तर  आमच्याकडून उधारीवर घेतलेला हा बॅट्समन आमच्या विरोधात उभे केला. आता सगळी असली टीम या मंचावर आहे. नकली टीमच्या भरवशावर कोणी मॅच जिंकू शकत नाही, असे म्हणत आमचाच विजय पक्का असल्याचे सांगितले.

  पवार साहेबांनी नातेपुते येथील सभेत मोहिते-पाटील यांचे नाव न घेता केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, या चड्डीवाल्यांच्याच सपोर्टवर आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात. त्यावेळी चड्डय़ा दिसल्या नाहीत त्यावेळी चांगल्या वाटल्या. पण काळजी करु नका 23 तारखेला कळेल कोणाच्या चड्डय़ा उतरणार आहेत असा घाणाघात फडणवीसांनी केला.

 रामदास आठवले म्हणाले, नरेंद्र मोदी विकास पुरुष आहेत. विकासाच्या दिशेने पुढे चाललेले नेते आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जी पार्लमेंटरी डेमॉक्रॉसी आहे वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू (एक व्यक्ती एक मत एक मोल) त्यानुसार प्रत्येक मत महत्वाचे आहे. तरी विचार करुन मतदान करा. कुर्डुवाडी हे रेल्वे प्रमाणेच सेना भाजप व आरपीआयचे जंक्शन आहे. मी रेल्वे कारखान्याचा व आरपीएफ ट्रेनिंग सेंटरचा प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट –

कृष्णा-भीमा अन् रेल्वे कारखान्याचा प्रश्न साडवू 

कृष्णा भिमा स्थिरीकरणाविषयी बोलताना ते म्हणाले, योजनेसाठी विजयदादांनी अनेकदा प्रयत्न केला तर अजितदादांनी तो हाणून पाडला. रणजितसिंह निंबाळकरांना तुम्ही निवडून द्या मी या सगळ्यांना घेऊन मोदीसाहेबांकडे जाऊन हा प्रश्न सोडवतो, अशी ग्वाही त्यांनी दिली. तर कुर्डुवाडी रेल्वे कारखान्याचा प्रश्न रेल्वेमंत्र्यांना समक्ष आणून हा प्रश्न सोडवू असेही ते म्हणाले.

Related posts: