|Sunday, November 17, 2019
You are here: Home » Top News » राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात दिलगिरी

राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात दिलगिरी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी ‘चौकीदार चोर है’ या सुप्रीम कोर्टाचा हवाला देत केलेल्या टीकात्मक वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार चोर है’ या वक्तव्याविरोधात भाजपच्या नेत्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता. राहुल यांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित असल्याचे त्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते. त्यावर राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. माझे वक्तव्य चुकीच्या अर्थाने घेतले गेल्याचे असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाला दिले आहे.

Related posts: