|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मानव एकता दिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर

मानव एकता दिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर 

 पुणे / प्रतिनिधी :

मानव एकता दिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर 24 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 6 वा. संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम येथे होणार आहे. या शिबिराच्या जनजागृती साठी संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन तर्फे 22 व 23 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते 8 वा. पथनाटय़ व रॅलीचे आयोजन गंगाधाम, मार्केटयार्ड, बिबेवाडी, काकडे वस्ती या परिसरात करण्यात येणार आहे, अशी माहिती मंगेश बडद यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी माराचंद करमचंदानी, आनंद कोचर, कमलेश रावलानी आदी उपस्थित होते.

एप्रिल 2019 ते मार्च 2020 या वर्षांमध्ये पुणे जिल्हय़ाच्या विविध भागामध्ये 28 रक्तदान शिबीर फौंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहेत. रक्तदानाच्या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने गेल्या महिन्याभरापासून संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन चे स्वयंसेवक गंगाधाम, मार्केटयार्ड च्या परिसरात घरा-घरात जाऊन रक्तदानाचे महत्व सांगत आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

Related posts: