|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राऊत-राणेंचे भवितव्य आज यंत्रबंद

राऊत-राणेंचे भवितव्य आज यंत्रबंद 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱया टप्प्यात कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन्ही मतदारसंघात मंगळवारी मतदान होत आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देते याचा निर्णय आज यंत्रबंद होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत विद्यमान खासदार व शिवसेना-भाजप महायुतीचे  विनायक राऊत व माजी खासदार महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नीलेश राणे यांच्यातच होत आहे. निवडणूक भयमुक्त वातावरणात व कोणत्याही अडथळय़ांशिवाय पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत, स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे, वंचित बहुजन आघाडीचे मारूती रामचंद्र जोशी, काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर, समाजवादी फॉरवर्ड ब्लॉकचे संजय गांगनाईक, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी राजेश जाधव, बहुजन समाज पक्षाचे किशोर वरक अपक्ष नारायण गवस, निलेश भाताडे, विनायक राऊत, पंढरीनाथ आंबेरकर, बहुजन मुक्ती पक्षाचे भिकूराम पालकर आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होत़े

ही निवडणूक बहुरंगी दिसत असली तरी प्रत्यक्षात नारायण राणे विरूद्ध शिवसेना असेच लढतीला स्वरूप आली आहे. याच दोन उमेदवारांमध्ये गतवेळीही लढत झाली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या नीलेश राणे यांना राऊत यांच्याकडून सुमारे दिड लाखांनी मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता स्वाभीमान या नव्याने स्थापन केलेल्या पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहे. स्वतःच्या पक्षाच्या नेटवर्कबरोबरच अन्य पक्षातील नाराज व फुटीरांना त्यांनी आपलेसे करत त्यांनी आव्हान निर्माण केले आहे. तर 6 पैकी 5 आमदार, कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे व भाजपच्या साथीने सेनेचे विनायक राऊत यांनी आव्हान दिले आहे. सुरूवातीला नाराज असलेले भाजपचे नेते राऊत यांच्या प्रचारात सक्रीय दिसले तरी काही कार्यकर्त्यांबाबत मात्र सभ्रमावस्था होती. याशिवाय काँग्रेस आघाडीने भंडारी समाजाचे नेते नवीनंचंद्र बांदीवडेकर व बहुजन वंचीत आघाडीने मारूती काका जोशी यांच्याकडूनही चांगली लढत दिली जाण्याची शक्यता आहे. 

Related posts: