|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दोन्ही तालुक्यातील धरणग्रस्तांचा उदयनराजेंना पाठींबा

दोन्ही तालुक्यातील धरणग्रस्तांचा उदयनराजेंना पाठींबा 

मेढा / प्रतिनिधी

       बामणोली तालुका जावली:- श्रमिक मुक्ती दलाने घेतलेला निर्णय आम्ही सर्वजण जावळी महाबळेश्वर तालुक्यातील कोयना धरण ग्रस्त ताकतीनिशी पाळणार आहोत. याचे उत्तर या भागातून उदयनराजे भोसले यांना मिळणाया मताधिक्य मध्ये दाखवून देऊ . श्रमिक मुक्ती दलाचे सर्व कार्यकर्ते व सर्व गाव कमिटय़ा त्यासाठी सज्ज झालेले आहेत . कोयना धरणग्रस्तांच्या मध्ये कोणीही अफवा पसरवू शकत नाही ,अफवा पसरवणाया ना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ. काल वर्तमानपत्रांमधून ज्या तथाकथित धरणग्रस्तांनी डॉ.भारत पाटणकर यांचा निर्णय आम्हास अमान्य अशी बातमी दिलेली आहे. त्याचा आम्ही कांदाटी कोयना सोळशी खोयातील जावळी महाबळेश्वर तालुक्यातील सर्व धरणग्रस्त जाहीर निषेध करतो. असे आवाहन जावली , महाबळेश्वर तालुक्यातील धरणग्रस्त बांधवांनी केला आहे.

      हे तथाकथित स्वतःला धरणग्रस्त समजणारे लोक ज्यावेळी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आंदोलने केली त्यावेळी या आंदोलनामध्ये सामील झालेले नव्हते, गेल्या वेळी 41 दिवसाचा प्रदीर्घ लढा दिला त्यावेळी सुद्धा हे आंदोलनात सामील झाले नव्हते , जनतेच्या प्रश्नांची यांना काहीही जाण नाही, त्यामुळे डॉ.भारत पाटणकर यांच्या विषयी व श्रमिक मुक्ती दल याविषयी बोलण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही , श्रमिक मुक्ती दलाच्या वार्षिक अधिवेशनात व गाव कमिटी यांच्या बैठकांमधून लोकशाही पद्धतीने सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देण्याबाबत निर्णय झालेला आहे.  श्रमिक मुक्ती दलाची निवडणुकांबाबत ची भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे , कोणाचेही सरकार आले तरी कष्टकरी जनतेला आपल्या हक्कासाठी लढावेच लागणार आहे, अगदी आपले म्हणवणारे आमदार, खासदार, मंत्री, झाले तरी, ( जरी श्रमिक मुक्ती दलाचे सरकार आले तरी) अशी श्रमिक मुक्ती दलाची पहिल्या पासून भूमिका आहे, कारण गाडी चालवणारा बदलला तरी बैल आणि गाडी तीच असते,  निवडणुकीतून प्रश्न सुटतील या भ्रमात श्रमिक मुक्ती दल कधीही नव्हते आणि आजही नाही,  प्रश्न राहिला तो पाठिंबा देण्याचा,

कोणाचेही सरकार आले तरी लढावेच लागणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे,  तर त्यातल्या त्यात कमी इजा होणे, त्यातल्या त्यात कमी लढावे लागणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जातीच्या, धर्माच्या नावाने कष्टकरी जनतेत फूट न पडणे,  आणि श्रमिक मुक्ती दलाने जो  जाहीरनामा काढला आहे त्यास त्या  उमेदवाराने सहमती देणे, हे ज्यांना मान्य आहे, त्या व्यक्तीला (पक्षाला नव्हे) श्रमिक मुक्ती दलाने पाठिंबा द्यायचा (म्हणजेच दगडा पेक्षा वीट मऊ )असे अधिवेशनात ठरलेले आहे, या सर्व बाबी या उमेदवारांनी पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे या सार्वजनिक लोकशाही पद्धतीने घेतलेल्या निर्णया विषयी व श्रमिक मुक्ती दल तसेच डॉ. भारत पाटणकर यांच्या विषयी या लोकांनी काहीही बोलू नये, ज्यावेळी जनता आंदोलनात होती त्यावेळी हे धरणग्रस्तांना वाटलेल्या जमिनीमध्ये दलाली कमवायच्या नादात होते . त्यामुळे डॉ. भारत पाटणकर व श्रमिक मुक्ती दल यांच्यावर बोलण्याचा यांना काहीही अधिकार नाही. असाही 3शारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

 

Related posts: