|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा मतदार संघातील पोस्टल मतदार वंचित

सातारा मतदार संघातील पोस्टल मतदार वंचित 

प्रतिनिधी / सातारा

सातारा लोकसभा मतदार संघात शासकीय सेवेत असणारे 9 हजार 502 मतदार आहेत. त्यापैकी सातारा विधानसभा मतदार संघातील गचाळ कारभाराचा फटका याच शासकीय मतदारांना बसला आहे. अनेक मतदारांना अर्जच पोहच झाले नाहीत. त्यामुळे त्यांना जेथे सध्या डय़ूटी मिळाली आहे. तेथून सातारा विधानसभा मतदार संघातील अधिकाऱयांकडून का नाही अर्ज पोहच झाला म्हणून विचारण्यासाठी अनेक मतदार सातारा तहसील कार्यालयातील निवडणूकीच्या कामाकरता नेमण्यात आले आहेत. त्यांना भेटून आपली व्यथा मांडल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे अनेकांना मतदानांच्या वंचित रहावे लागल्याचे दुख मतदानांमध्ये व्यस्त असलेल्या सातारा विधानसभा मतदार संघातील सर्व्हीस मतदारांनी व्यथा मांडली आहे.

पोस्टल मतदान हे शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या बाहेरगावी काम करत असलेल्या मतदारांकरता असते. सातारा जिह्यात अशा मतदारांची नोंदणी 9 हजार 502 इतकी आहे. त्यामध्ये वाई विधानसभा मतदार संघात 1 हजार 35, कोरेगाव विधानसभा मतदार संघात 3 हजार 389, कराड दक्षिणमध्ये 2 हजार329, कराड उत्तरमध्ये 631, पाटणमध्ये 722, सातारामध्ये 1396 असे मतदार आहेत. सातारा लोकसभा मतदार संघात अनेक शासकीय नोकरदार हे जिह्यातले जिह्यातच काम करतात. परंतु ते आपल्या गावापासून वेगळय़ा ठिकाणी नोकरी करतात. अशांना पोस्टल मतदान करता येते. सातारा विधानसभा मतदार संघातील काही अशा मतदारांची सध्या नियुक्ती इतर विधानसभा मतदार संघात झाली आहे. तसेच त्यांना पोस्टल मतदानाकरता असलेला अर्जही पोहच झाला नव्हता. त्यामुळे संबंधित मतदारांने सातारा तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱयांना विचारण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांच्याकडून थातूरमातूर उत्तर दिल्याने त्या पोस्टल मतदानाचा नाद त्यांनी सोडून दिला आहे. अशा अनेक घटना सातारा विधानसभा मतदार संघात झाल्याची चर्चा असून आमचे अनमोल मत वाया गेल्याचेही त्यांनी खदखद ऑफ दी रेकॉर्ड बोलून दाखवली. वास्तविक मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचनेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या झटत आहेत. परंतु त्यांच्या या सुचनेची अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी काही अधिकारी पायमल्ली करत आहेत. शासकीय कर्मचारीच मतदानापासून वंचित राहत असल्याने त्या कर्मचाऱयांनी ही तक्रारही करायची कोठे आपल्यावरच बिलामत ओढावले, अशी भिती असल्याने तक्रारही करणे टाळल्याचे संबंधित त्या मतदाराने  सांगितले. 

Related posts: