|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » Top News » राज्यात तिसऱया टप्प्यातील मतदानाला सुरूवात

राज्यात तिसऱया टप्प्यातील मतदानाला सुरूवात 

ऑनलाईन टीम / मुंबई :
लोकसभा निवडणुकांच्या तिसऱया टप्प्यासाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. तिसऱया टप्प्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचा समावेश आहे. उदयन राजे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, चंद्रकांत खैरे यासारख्या दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर सतत चर्चेत राहिलेल्या माढा, अहमदनगर, जालना, सातारा, जळगाव या जागांचा समावेश या टप्प्यात आहे. देशभरातील 15 राज्यांमधल्या 116 जागांसाठी मतदान होईल.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

या टप्प्यात दोन कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये एक कोटी 33 लाख 19 हजार 10 पुरुष तर एक कोटी 24 लाख 70 हजार 76 महिला आणि 652 इतर नागरिक मतदान करणार आहेत.

तिसऱया टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार आहेत. बारामती मतदारसंघात सर्वाधिक (चार) महिला उमेदवार आहेत. पुणे आणि माढा मतदारसंघात सर्वाधिक (प्रत्येकी 31) उमेदवार असून सर्वात कमी (9) उमेदवार सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत.

नेते आणि अभिनेते यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क यावेळी बजावला.

राज्यात 1 वाजेपर्यंत 35.70 टक्के मतदान

जळगाव – 33.12 

रावेर – 35.15 

जालना – 37.91 

औरंगाबाद – 35.42 

रायगड – 38.74 

पुणे – 27.17 

बारामती – 35.58 

अहमदनगर – 34.73 

माढा – 33.41 

सांगली – 34.56 

सातारा – 34.84 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 39.93 

कोल्हापूर – 42.04 

हातकणंगले- 39.68

 

Related posts: