|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » देशात तिसऱया टप्प्यात सरासरी 63.24 टक्के मतदान

देशात तिसऱया टप्प्यात सरासरी 63.24 टक्के मतदान 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशातील लोकसभेच्या तिसऱया टप्प्यातील 117 जागांसाठी आज मतदान संपन्न झाले. यात 13 राज्यांसह 2 केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यासाठी महाराष्ट्रासह 15 राज्यात किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले आहे. 15 राज्यातील 117 जागांवर सरासरी 63.24 टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात 55.05 टक्के मतदान झालं. देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 79 टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी 12.46 टक्के मतदान झाले.

आज सकाळपासूनच 15 राज्यात मतदान प्रक्रिया सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सपा नेते अखिलेश यादव, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्यासह अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदान केलं. यावेळी महिलांनी मतदानात सर्वाधिक भाग घेतला होता.

सायंकाळपर्यंत आसाम 78.29, बिहार 54.95, छत्तीसगड 65.91, दादर नगर हवेली 71.43, दमण आणि दीव 65.34, गोवा 71.09, गुजरात 60.21, जम्मू-काश्मीर 12.86, कर्नाटक 64.14, केरळ 70.21, महाराष्ट्र 56.57, ओडिसा 58.18, त्रिपुरा 71.13, उत्तर प्रदेश 57.74 आणि पश्चिम बंगाल 79.36 टक्के मतदान झाले आहे.  

Related posts: