|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » दगडूशेठला मोगऱयासह 1 कोटी सुवासिक फुलांचा महाअभिषेक

दगडूशेठला मोगऱयासह 1 कोटी सुवासिक फुलांचा महाअभिषेक 

 

 प्रतिनिधी / पुणे :  मोगऱयाच्या फुलांची आकर्षक सजावट… चाफा, झेंडू, गुलाब, लिलीसारख्या फुलांनी सजलेला गाभारा आणि शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीला मोग-यांसह 1 कोटी सुवासिक फुलांचा महाअभिषेक करण्यात आला. सुवासिक फुलांनी सजलेले मंदिर आणि गणरायाचे रुप डोळय़ांमध्ये साठविण्यासोबत मोबाईल कॅमेऱयामध्ये हे क्षण अनेकांनी टिपले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅ[.शिवराज कदम जहागिरदार, युवराज गाडवे, शिरीष मोहिते यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि सहका-यांनी पुष्परचना केली.

सोमवार (दि.22) पासून या पुष्पसजावटीची तयारी तब्बल 300 महिला व 250 पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये 1300 किलो झेंडू, 2300 किलो मोगरा यांसह चाफा, लिली, गुलाब, गुलछडी, जास्वंद, कमळ, जाई-जुई, चमेली आदी प्रकारची लाखो फुले वापरण्यात आली. गोल रिंगांची झुंबरे आणि कमानी हे यंदाच्या सजावटीचे वैशिष्टय होते.

मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले. यामध्ये ज्ये÷ कीर्तनकारांसह युवा वारकऱयांनी देखील मोठया उत्साहाने सहभाग घेतला. श्रींच्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरी याच्या उटीचे लेपन करण्यात आले होते.