|Saturday, February 29, 2020
You are here: Home » leadingnews » ममता बॅनर्जी मला दरवर्षी कुर्ते आणि मिठाई पाठवतात : मोदी

ममता बॅनर्जी मला दरवर्षी कुर्ते आणि मिठाई पाठवतात : मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अजूनही मला वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेट म्हणून पाठवतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

बुधवारी अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकीय आणि खासगी आयुष्याबाबत मोदींनी मनमोकळी उत्तरे दिली. मोदी म्हणाले, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील मला वर्षातून तीन ते चार वेळा ढाका येथून मिठाई पाठवतात. ही गोष्ट जेव्हा ममता बॅनर्जींना समजली तेव्हापासून त्या देखील वर्षातून एक-दोनवेळा कुर्ते आणि बंगाली मिठाई पाठवू लागल्या, असे मोदींनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

Related posts: