|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » दिल्लीत गौतम गंभीर ठरला श्रीमंत उमेदवार

दिल्लीत गौतम गंभीर ठरला श्रीमंत उमेदवार 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  क्रिकेटपटू गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना गंभीरने आपली संपत्ती जाहीर केली आणि त्यात तो 147 कोटींच्या संपत्तीचा मालक असल्याचे समोर आले आहे. 2017-18च्या प्राप्ती कर परतावात गंभीरने त्याचे उत्पन्न 12.40 कोटी असल्याचे जाहीर केले आहे, तर त्याची पत्नी नताशाच्या प्राप्ती कर परतावात 6.15 लाखाचे उत्पन्न दाखवले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत विविध पक्षांचे मिळून 349 उमेदवार उभे आहेत आणि त्यात सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून गंभीरने मान पटकावला आहे. उमेदवारी अर्ज भरताना पश्चिम दिल्ली मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर उभे असलेले महाबल मिश्रा हे दुसरे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी 45 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 12 कोटींची वाढ झाली आहे.

 

Related posts: