|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » योगेंद्र पुराणिक जपानमध्ये निवडणूक जिंकणारे पहिले भारतीय

योगेंद्र पुराणिक जपानमध्ये निवडणूक जिंकणारे पहिले भारतीय 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई :  भारतीय वंशाचे 41 वषीय योगेंद्र उर्फ योगी जपानमधील निवडणूक जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. योगेंद्र यांनी जपानची राजधानी टोकियोमधील ‘इडोगावा म्युनिसिपल कॉर्पोरेशन’च्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला होता. त्यासाठी 21 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये योगेंद्र यांना 6477 मते मिळाली. विशेष म्हणजे योगेंद्र हे मराठी माणूस असून ते मूळ पुण्याचे रहिवासी आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील योगेंद्र पुराणिक यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 1997 साली योगी शिक्षणा निमित्त जपानला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जपानच्या आयटी कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बरीच वर्षे जपानमध्ये काम केले. त्यांनी श्ग्zल्प्द बँकेत शेवटची नोकरी केली. योगेंद्र सध्या माजी बँक कर्मचारी असून नुकतेच त्यांनी जपानमधील इडोगाव मतसंघातून निवडणूक लढवली. या विभागात जवळजवळ 4 हजार 500 भारतीय स्थायिक आहेत. जपामध्ये राहणाऱया सर्वाधिक भारतीयांची संख्या जवळपास 10 टक्के येथेच आहे. त्यामुळेच योगींना येथून विजय मिळवता आला. त्यांना मिळालेली मते ही तेथील 2,26,561 मतांमध्ये पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक मते ठरली आहेत.

 

Related posts: