|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ममतांच्या राजकीय अस्तास प्रारंभ : मोदी

ममतांच्या राजकीय अस्तास प्रारंभ : मोदी 

तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधानांची प्रचारसभा

वृत्तसंस्था/ बोलपूर 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात आयोजित सभेत त्यांना ‘स्पीडब्रेकर दीदी’ ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूलच्या सरकारवर सडकून टीका केली. पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्हय़ातील बोलपूरमध्ये मोदींनी जाहीर सभा घेतली आहे. पहिल्या 3 टप्प्यांच्या मतदानानंतर पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींच्या राजकीय अस्तास प्रारंभ झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

‘बंगाल का कोना-कोना बोल रहा है, सिंडिकेट का सिंहासन डोल रहा है’ असा नाराही पंतप्रधानांनी दिला आहे. बंगालमध्ये एक दिवस लोकांना स्वतःच्या अधिकारांसाठी याचना करावी लागेल अशी कल्पनाही गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी कधी केली नसेल असे मोदी म्हणाले.

भारताचा वाढला प्रभाव

चहावाल्याने 5 वर्षांमध्ये केवळ विदेश दौरे केल्याचा आरोप ममतादीदी करतात. पण जगात भारताचा प्रभाव दिसून येतोय, भारताचे महत्त्व जगाने मान्य केले आहे. पंतप्रधान म्हणून माझ्या विदेश दौऱयांमुळेच भारताच्या जनतेचा बुलंद आवाज अन्य देशांपर्यंत पोहोचला आहे. 5 वर्षांपूर्वीपर्यंत कोणत्याही मुद्यावर जगाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी दमछाक व्हायची, पण आता स्थिती बदलली आहे. जे देश पूर्वी आम्हाला महाग दरात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची विक्री करायचे, त्यांच्यासोबत मैत्रिपूर्ण चर्चा करत दर घटविल्याचे म्हणत मोदींनी स्वतःच्या यशस्वी विदेश धोरणाचा उल्लेख केला आहे.

दीदींना गरिबाची चिंता नाही

बंगालसाठी मोदी करत असलेल्या चांगल्या कामांना रोखण्याचा ममतादीदींचा प्रयत्न आहे. ममतांनी आयुष्मान भारतावरही टाळे ठोकले आहे. गरिबांच्या आरोग्याची ममतांना चिंता नाही. बांगलादेशातून लोकांना आणा, मोदींना हटवा या एकाच गोष्टीला त्यांचे प्राधान्य असल्याचे उद्गार मोदींनी सभेत काढले आहेत. 

Related posts: