|Thursday, January 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » स्फोटानंतर श्रीलंकेतील मुस्लीम दहशतीत

स्फोटानंतर श्रीलंकेतील मुस्लीम दहशतीत 

घरांमधून बाहेर पडण्याची भीती : सिंहली बौद्धांसोबतच्या संघर्षाची पार्श्वभूमी

वृत्तसंस्था/ कोलंबो

बॉम्बस्फोट झाल्यापासून श्रीलंकेत तणावाचे वातावरण पसरले आहे. या तणावपूर्ण वातावरणात स्थानिक मुस्लीम घरामधून बाहेर पडणे टाळत आहेत. मुस्लीम असल्याने हल्ला होण्याची भीती त्यांना सतावू लागली आहे. रविवारी श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेल्समध्ये झालेल्या 8 बॉम्बस्फोटांमध्ये 350 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत.

स्कलकॅपमध्ये (टोपी) पाहिल्यावर कुणीही आम्हाला स्वतःचा शत्रू समजत असल्याने आम्ही अत्यंत भयभीत झालो आहोत. आम्ही शत्रू नसल्याचे प्रत्येकाला सांगू इच्छितो. श्रीलंका ही आमची मातृभूमी असल्याचे उद्गार आर.एफ. अमीर यांनी काढले आहेत.

दहशतीचे वातावरण

या स्फोटांमुळे श्रीलंकेत दहशतीचे वातावरण असून मुस्लीम समुहांनीही हल्ल्यांची निंदा केली आहे. पण समुदायाचा एक मोठा वर्ग अद्याप भीतीच्या छायेखाली आहे. ईस्टरपासून आपण झोपू शकलेलो नाही. मुस्लिमांबद्दल लोकांमध्ये तीव्र संताप असल्याचे 60 वर्षीय जरीना बेगम यांनी म्हटले आहे. 

मुस्लिमांचे प्रमाण 10 टक्के

श्रीलंकेच्या सुमारे 2.1 कोटी लोकसंख्येत सिंहली बौद्ध बहुसंख्याक आहेत. देशात दुसऱया क्रमांकावर हिंदूंची संख्या असून मुस्लिमांचे प्रमाण 10 टक्क्यांच्या आसपास आहे. श्रीलंकेच्या लोकसंख्येत ख्रिश्चनांचे प्रमाण सुमारे 7 टक्के इतके आहे.

श्रीलंकेत बुरख्यावर बंदी शक्य
ईस्टरच्या दिवशी झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर श्रीलंकेने बुरख्यावर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे. संशयितांची चौकशी आणि अन्य पुराव्यांद्वारे मिळालेल्या माहितीतून मोठय़ा संख्येत महिला या गुन्हय़ात सामील असल्याचे संकेत मिळाले आहेत.

मशिद पदाधिकाऱयांशी चर्चा
मशिदीच्या पदाधिकाऱयांशी विचारविनिमय केल्यावर हे पाऊल लागू करण्याची योजना आखली जात आहे. श्रीलंकेच्या अनेक मंत्र्यांनी राष्ट्रपती मैत्रिपाल सीरिसेना यांच्याशी या मुद्यावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related posts: