|Sunday, September 22, 2019
You are here: Home » क्रिडा » मास्टर ब्लास्टर विनोद कांबळीला ट्रोल करतो तेव्हा

मास्टर ब्लास्टर विनोद कांबळीला ट्रोल करतो तेव्हा 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :  विनोद कांबळी ने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी सचिनने त्याच्या नव्या लूकवरून त्याला ट्रोल केले. विनोद शुभेच्छांबद्दल धन्यवाद, तू गायलेले गाणे उत्तम आहे. पण तुझी दाढी पांढरी झाली तरी तुझ्या भुवया मात्र अजूनही कशाकाय काळय़ा राहिल्या? असा सवाल करत सचिनने विनोद कांबळीची फिरकी घेतली.

त्याचे झाले असे की, बुधवारी सचिनला शुभेच्छा देण्यासाठी विनोद कांबळी याने एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्याने 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या याराना चित्रपटातील ‘तेरे जैसा यार कहॉ’ हे गाणे स्वतःच्या आवाजात गायले. दरम्यान, विनोद कांबळी याने दिलेल्या शुभेच्छांचा सचिनने एका दिवसानंतर स्वीकार केला. तसेच त्याला गमतीशीर भाषेत उत्तर देत विनोद कांबळीला ट्रोल केले.