|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नाही

राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नाही 

 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राजकारणात येण्याचा किंवा कोणताही राजकीय पक्ष सुरु करण्याचा कोणतीही इच्छा नाही. आपण जर राजकारणात प्रवेश करायचं ठरवलं तर बायको सोडून देईल असं त्यांचं म्हणणं आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती की, लोकसभा निवडणुकीत जर विरोधी पक्षांचं सरकार आलं तर रघुराम राजन यांना अर्थमंत्री केलं जाण्याची शक्मयता आहे. मात्र रघुराम राजन यांनी आपल्यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आपण जिथे आहोत तिथे प्रचंड आनंदी असून राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नाही असं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच रघुराम राजन यांनी आपण राजकारणात आल्यास कौटुंबिक आयुष्यात समस्या निर्माण होतील असंही त्यांना वाटत आहे.