|Saturday, December 7, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ‘अरुणाचल, काश्मीर’प्रश्नी चीनची नरमाई

‘अरुणाचल, काश्मीर’प्रश्नी चीनची नरमाई 

भारताचा अविभाज्य भाग असल्याचे केले मान्य : चीनमधील संयुक्त परिषदेदरम्यान बाब उघड

वृत्तसंस्था/ बीजिंग

अरुणाचल प्रदेश आपला आहे असा दावा करणाऱया चीनने अखेर आपली चूक सुधारली असून जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य करत नरमाईची भूमिका घेतली आहे. चीनमधील संयुक्त परिषदेदरम्यान ही बाब उघड झाली असली तरी चीनचा हा नकाशातील देखावा कितपत टिकतो? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

बीजिंग येथे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह परिषद सुरु असून यावेळी चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे सादर केले आहेत. या नकाशांमध्ये जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशचा समावेश भारतीय हद्दीत करत भारताला सुखद धक्का दिला आहे. या परिषदेमध्ये भारताने सलग दुसऱयांना परिषदेवर बहिष्कार टाकूनही नकाशात भारत बीआरआयचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. तीन दिवसांच्या बीआरआय परिषदेमध्ये चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने हे नकाशे प्रदर्शित केले आहेत.

चीनने याआधी अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग दाखवणारे अनेक नकाशे नष्ट केले होते. हा चीनचा भाग असल्याचा दावा वारंवार चीनने केला असून भारतीय नेत्यांनी केलेल्या दौऱयांचाही निषेध केला आहे. याआधी चीनने त्यांच्या नकाशात जम्मू काश्मीर हा पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा भाग असल्याचा दावा अनेकदा केला होता.

Related posts: