|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » नोटाबंदीनंतर जीएसटी म्हणजे लिंबावर कारले खाल्यासारखे

नोटाबंदीनंतर जीएसटी म्हणजे लिंबावर कारले खाल्यासारखे 

ऑनलाईन टीम / छिंदवाडा :

व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो. देशापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. मोदींनी जेव्हा नोटाबंदीनंतर जीएसटी लागू केला तेव्हा तो आंबट लिंबावर कारलं खायला दिल्यासारखं होतं, अशी खरमरीत टीका शत्रुघ्न सिंन्हा यांनी केली.

शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत ते बोलत होते. सिन्हा म्हणाले, काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते आणि त्यामुळेच मी या पक्षात आलो आहे. काँग्रेसने देशासाठी मोठे योगदान दिल्यानेच मी काँग्रेसमध्ये आलो आहे. यानंतर पुन्हा कोणत्याही पक्षात जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.