|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » दिल्लीत अखेर आप आणि काँग्रेसमधील बोलणी फिसकटली

दिल्लीत अखेर आप आणि काँग्रेसमधील बोलणी फिसकटली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीतील आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युतीची बोलणी अखेर फिसकटली आहे. आता दोन्ही पक्ष दिल्लीतील लोकसभेच्या 7 ही जागा स्व बळावर लढविणार आहेत. दोन्ही पक्षात आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस आणि आपमध्ये युती हू शकलेली नाही. कारण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नीयत चांगली नाही. आमआदमी पक्षाकडून युतीसाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आले. परंतू काँग्रेसने आपली पावले मागे घेतली. असे केजरीवाल यांनी सांगितले.