|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पनवेलमध्ये मतदारांना पैसे वाटप करणारा अटकेत

पनवेलमध्ये मतदारांना पैसे वाटप करणारा अटकेत 

 ऑनलाईन टीम / पनवेल :

पनवेलमधील सुकापूरमध्ये पैसे वाटप करणाऱया एका कार्यकर्त्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक भरारी पथक क्रमांक 5 मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख महेंद्र गगलानी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.

प्रताप रामचंद्र आरेकर असे अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. संबधित कार्यकर्त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या नावाच्या 78 कोऱया व मतदारांच्या चिठ्ठय़ा सापडल्या. त्याच्याकडे 5800 रुपये रोख रक्कम असलेले 29 खाकी लिफाफे सापडले. प्रत्येक लिफाफ्यात 200 रुपयांच्या नोटा होत्या.