|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कॅलिफोर्नियात बेछूट गोळीबार

कॅलिफोर्नियात बेछूट गोळीबार 

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

कॅलिफोर्निया येथील यहुदी समुदायाच्या प्रार्थनास्थळावर एका युवकाने बेछूट गोळीबार केला. यात एक वृद्ध महिला ठार झाली. तर तिघे जखमी झाले. जखमींमध्ये यहुदीच्या धर्मगुरुंचा व बालिकेचा समावेश आहे. 19 वर्षीय संशयितास येथील स्थानिक पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. तसेच रायफलही जप्त केली आहे. त्याने हल्ल्यापूर्वी अर्धा तास फेसबुकवर हल्ल्यासंदर्भात पत्र प्रसारित केल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी 27 रोजी झालेल्या या हल्ल्याबाबत अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच संपूर्ण अमेरिका यहुदी समुदायबरोबर असल्याचे सांगितले आहे.

 सहा महिन्यांपूर्वी पीटर्सबर्ग येथेही अशाचप्रकारे झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला अमेरिकेतील यहुदी समुदायावरील सर्वात मोठा हल्ला मानला जातो. घटनास्थळावरील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रार्थनास्थळावर अचानक बेछूट गोळीबार चालू झाला. यात चौघे जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेले असता एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. इतर तिघांची प्रकृती गंभीर आहे. गोळीबारनंतर तो तरुण त्याच्या कारमधून पळून गेला. यावेळी डय़ूटी संपवून जाणाऱया एका पोलीस अधिकाऱयाने त्याच्या कारवर गोळीबार करत पाठलाग केला. व त्यास अटक करण्यात आली. त्याच्या कारमधून एआर-15 ही आधुनिक रायफल हस्तगत करण्यात आली. संशयिताची सोशल माध्यमावरुन माहिती जाणून घेण्यात येत आहे.