|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » साकेत रविवार ठरतोय ‘ट्राफिक जाम’

साकेत रविवार ठरतोय ‘ट्राफिक जाम’ 

वार्ताहर / व्हनाळी

कागल तालुक्यातील पंचक्रोशीत डोंगर कपारीत वसलेले नवसाला पावणारे साके येथील ग्रामदैव श्री भैरवनाथ देवालयाची महती परिसरात फार प्राचिन काळापासून आजही तशीच आहे. भैरवनाथ देवालय हे नवसाला पावत आहे. शिवाय माहेरवाशींनी नवसाने तर अनेक भक्तगण इच्छेने बकरी, कोंबडा देवून देवाची जत्रा मोठय़ा भक्तीने रविवारी करून शेकडो लोकांच्या स्नेहभोजनाने होतेय. त्यामुळे साके भैरोबाचा रविवार ठरतोय ‘ट्राफिक जाम रविवार’.

काल रविवारी या भैरवनाथ मंदिर परिसरात पंचक्रोशीतील माहेरवाशींनी, भक्तगण बाचणी, केंबळी, बेलवळे, सांगली, मिरज, उगार आदी परिसरातील सुमारे शेकडो जत्रांची गर्दी व स्नेहभोजनासाठी आलेल्या नागरिकांची मांदिआळी पहायला म़िळाली  यामुळे या रविवारी साकेच्या भैरोबाचा रविवार हा जत्रांचा महावारच असल्याचे चित्र या दिवशी पहायला मिळाले. तर अरूंद रस्ता पार्किंगचा अभाव असल्याने कांही लोकांनी गुरूवार पासूनच जत्रेच्या भोजन कार्यासाठी मंडप घालून जागा अखली होती. तर कांही भक्तांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागा निश्चित करून मंडप उभारणी केली तर  रविवारी आलेल्या सांगली,उगार ,मिरज आदी भागातील माहेरवाशींनींनी मंदिर परिसरापासून कांही अंतरावर शेतात झाडाखलीच जत्रांचा ठिया मांडला आणि शेकडो लोकांना स्नेहभोजनाची व्यवस्था केली. माघ पार्णेमेनंतर होणार-य़ा भैरवनाथ देवालयाच्या यात्रेनंतर प्रत्येक रविवारी या जत्रांना सुरूवात होत असून सध्या जत्रांची मोठी गर्दी या उष्णतेच्या महिन्यात येथे रविवारी पहायाला मिळत आहे. गावातील खराब  रस्ता यंदा चांगला झाला आहे. मात्र साताप्पा पाटील ते भैरवनाथ मंदिर परिसरात जाण्यासाठी असलेला रस्ता पुर्णपणे खराब झाला आहे. शिवाय अरूंद रस्ता असल्यामुळे  टूव्हीलर,फोरव्हीलर अशा शेकडो वहानांना लावणेसाठी पार्कींगची सोय नसल्याम़ुळे दुपारी बारा ते चार या वेळेत वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय पिण्यासाठी मंदिर परिसरात ग्रामपांचायतीने पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी भक्तगण,नागरिकातून होत आहे.  

पर्यटनस्थळ होण्याची गरज …

गेल्या अनेक वर्षापासून साके येथील भैरवनाथ देवालय हे  पर्यटनस्थळ व्हावे अशी मागणी पंचक्रोशीतील भाविकभक्तातून होत असून त्यामुळे मंदिर परिसराचे सुशोभीकरणासह  रस्ते,पाणी आदी सुविधा उपलब्ध होतील शिवाय बाहेरून येणा-या भक्तांसाठी हे सोयीचे होईल त्यामुळे साके येथील भैरवनाथ देवस्थान पर्यटनस्थळ होणे गरजेचे असल्याचे येथील नागरिक सांगतात.

Related posts: